Thursday, April 30, 2020

Andre Russell ट्वेंटी-20 फ्रँचायझी मालकावर भडकला; केले गंभीर आरोप

Andre Russell ट्वेंटी-20 फ्रँचायझी मालकावर भडकला; केले गंभीर आरोप


वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलनं काही दिवसांपूर्वी कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील जमैका थलाव्हास संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक रामनरेश सारवानवर टीका केली होती. त्याच्यापाठोपाठ आंद्रे रसेलनं जमैका थलाव्हास फ्रँचायझीवर गंभीर आरोप केले आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला थलाव्हास संघानं गेलला रिलीज केले. गेल कॅरेबियन प्रीमिअर लीग 2020च्या मोसमात आता सेंट ल्युसिया झौक्स संघाकडून खेळणार आहे. थलाव्हास संघाच्या निर्णयावर 40 वर्षीय गेलनं नाराजी व्यक्त केली आणि ती करताना त्यानं राष्ट्रीय संघातील माजी सहकारी रामनरेश सारवानवर गंभीर आरोप केले.

गेल म्हणाला,''माझ्या वाढदिवसाला सारवाननं संघाच्या वाटचालीबाबात मोठं भाषण केलं होतं. मग, असं काय घडलं की मला रिलीज केलं गेलं? सारवान तू साप आहेस. कॅरेबिन बेटावर तू कोणालाच आवडत नाहीस. तू अजूनही बालीश आहेस.लोकांसमोर तू चांगला माणूस, संत असल्याचा आव आणतोस, पण तू राक्षस आहेस.''  

आता रसेलनं थलायव्हास संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ मिलर आणि मालक क्रिश पेर्सोद यांच्यावर टीका केली. तो म्हणाला,''यंदाचे वर्ष अडचणींच होतं. मी आतापर्यंत खेळलेल्या ट्वेंटी-20 लीगमधील ही सर्वात अस्वाभाविक  फ्रँचायझी आहे. मी जेव्हा त्यांना विचित्र म्हणतोय, तेव्हा लोकांनी आपापल्या परीनं त्याचा अर्थ लावावा. या संघातील मी सामान्य खेळाडू नाही. मी संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. त्यामुळे फ्रँचायझी काय विचार करते आणि ते कसे काम करते, हे मला चांगलंच माहित्येय. त्यामुळे मला प्रत्येक सामन्यात मी प्रथम श्रेणीतील खेळाडू असल्यासारखे वाटते. तुमच्या मताला काहीच किंमत नसते. मला अशी वागणुक दिली जाते.''
तो पुढे म्हणाला,''आपण संघात कोणाला कायम राखणार आहोत? कोणाला नव्यान संघात घेणार आहोत? माझ्या या प्रश्नांचं उत्तर मला कधीच मिळाले नाही. संघात संवादच होत नाही आणि ही मोठी समस्या आहे. त्यामुळे या संघाकडून माझे हे अखेरचे सत्र असू शकते.'' 


No comments:

Post a Comment

Here's your unique Code snippet. Click this code to copy it right to your clipboard.