Tuesday, April 28, 2020

मालेगांवात कोरोनाचे थैमान

मालेगांवात कोरोनाचे थैमान





मालेगावमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असून आज सकाळी (ता.२८)  दिवसभरात तब्बल ४८ कोरोना बाधित आढळले आहेत. मालेगाव शहरातील कोरोना रूग्णांची संख्या १७१ झाली आहे.आज (ता.२८) मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालात एकाच वेळी तब्बल ३६ रूग्ण आढळले. तर दुपारी प्राप्त ११४ रुग्णांच्या अहवालात १०२ अहवाल निगेटिव्ह तर १२ पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन पोलिसांचा समावेश असल्याची धक्कादायक बातमी मिळत आहे. तर सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या ३६ जणांमध्ये शहरातील जयरामनगर भागातील ४२ वर्षीय कोरोनाबाधित तरूणाचा मृत्यू झाला. सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या ३६ रुग्णांमधील ३ रुग्णांचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अशा रितीने नाशिक जिल्ह्याची संख्या १९३ अशी झाली आहे

हेही वाचा:https://pawantvlive.blogspot.com/2020/04/solapur-district.html?m=1


दिवसभरात तब्बल ४८ कोरोना बाधित...
▪दुपारी प्राप्त ११४ रुग्णांच्या अहवालात १०२ अहवाल निगेटिव्ह तर १२ पॉझिटिव्ह...

▪ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन पोलिसांचा समावेश...

▪सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या ३६ जणांमध्ये शहरातील जयरामनगर भागातील ४२ वर्षीय कोरोनाबाधित तरूणाचा मृत्यू...

▪सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या ३६ रुग्णांमधील ३ रुग्णांचा दुसरा अहवाल आला होता पॉझिटिव्ह...

▪मालेगाव : १७१ (१५ मृत)

▪नाशिक जिल्हा : १९३

मालेगावातील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब
मालेगावातील वाढती रुग्णसंख्या जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब ठरत आहे. ज्यामुळे शहरात चिंतेचे वातवरण आहे.

No comments:

Post a Comment