Tuesday, April 28, 2020

Stay at home

कोरोनाला लाईटली घेत
लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणाऱ्यांसाठी
एक वास्तव.

एक दिवस
अचानक ताप येतो
घसा दुखू लागतो
खोकला सुरू होतो
श्वास घ्यायला त्रास होतो
कोविड टेस्ट केली जाते
तीन दिवस टेंशनखाली जातात
टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर...
रिपोर्ट थेट महापालिकेकडे जातो
रिपोर्टवरून हॉस्पिटल दिले जाते
एक अँम्ब्युलन्स  सोसायटीत येते
सगळेजण खिडकीतून तुमच्याकडे पाहतात
काही मनापासून शुभेच्छा देतात
काही मनातून  हसतात
अँम्ब्युलन्सचे कर्मचारी तुम्हाला सोबत कपड्याची एक बॅग घ्यायला सांगतात...
आता तुमचे घरचे तुम्हाला डोळे भरून पाहतात
तुमचे अश्रूंनी भरलेले डोळे खूप बोलतात
चला लौकर आत बसा... कर्मचारी तुमच्यावर खेकसतो
धाडकन दरवाजा बंद होतो
अँम्ब्युलन्स  सायरन देत निघते
सोसायटी सील केली जाते
चौदा दिवस तुम्हाला बेडवर पोटावर झोपवले जाते
अगदी साधं जेवण जेवण्यापुरती मुभा मिळते
टीव्ही मोबाईल वगैरे काही नाही
दिवसरात्र तुम्हाला समोरच्या भिंतीवर तुमच्या आयुष्याचा चित्रपट दिसतो
तुम्ही बरे झालात तर बरं
तीन टेस्ट निगेटिव्ह आल्या तरच तुम्हाला घरी घेऊन येतात
पण...
उपचारा दरम्यान तुम्ही देवाघरीही जाऊ शकता
तसे गेलात तर...
तुमचा देह प्लास्टिकमध्ये रॅप करून थेट स्मशानात पाठवतात...
घरच्यांना अंत्यदर्शन नाही..
स्मशानात कसलेही विधी नाहीत..
एक डेथ सर्टिफिकेट तुमच्या कुटुंबियांना देतात..
एक खेळ खल्लास.

बिच्चारा गेला.

तेव्हा उगाच घराबाहेर पडू नका.
घरातच थांबा.. मोह टाळा.

आयुष्य सुंदर आहे...

No comments:

Post a Comment