Friday, May 1, 2020

लातूर जिल्ह्यात पुन्हा एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला

लातूर जिल्ह्यात पुन्हा एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला


14 रुग्णांचे स्वॅब तपासणी सुरू ; अहवालाची प्रतीक्षा

एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वांच्या चिंतेत पडली भर 

लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज पुन्हा एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. दोन रुग्णांची पुन्हा नव्याने स्वॅब तपासणी होणार आहे. आज 53 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 39 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत मात्र 14 जणांचे अहवाल अजून येणे बाकी आहे.
48 तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार
30 एप्रिल रोजी एकूण 45 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी (कोविड19) साठी करण्यात आली होती त्यापैकी 42 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 03 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते. त्यांपैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दोन व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची 48 तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.
रात्री उशिरापर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त होतील-डॉ. गिरीष ठाकूर
1 मे रोजी एकूण 53 व्यक्तींचे स्वॅब (कोविड 19) तपासणी साठी आले होते. त्यापैकी 39 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्या सर्व 39 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित 14 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी चालू असून रात्री उशिरापर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त होतील, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment