*श्री भुसार आडत व्यापारी संघ सोलापूर*
दिनांक २४/५/२०२१
आपल्या बाजारपेठेतील सर्व व्यापारी बंधूंना कळविण्यात येते की, शनिवार दिनांक २२/५/२०२१ रोजीच्या *कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय विजयकुमार देशमुख मालक आणि मनपाचे उपायुक्त माननीय धनंजय पांडे साहेब आणि संघाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली होती सदर बैठकीतील आश्वासनानुसार आज सोमवार दिनांक २४/५/२०२१ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठक पार पडली.
सदर बैठकीमध्ये *मनपाचे उपायुक्त श्री धनराज पांडे साहेब यांनी व जेलरोड चे पोलीस निरीक्षक शिंगाडे साहेब यांनी समन्वय साधून व्यापाऱ्यांचे जे-जे अडचणी आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा होवुन ते दूर करण्यात येईल आणि गेट मध्ये अधिकारी वर्गाकडून अरेरावी व विनाकारण कार्यवाही होणार नाही याप्रमाणे आश्वासन दिले. तसेच ज्या व्यापार्यांनी लस घेतले आहे त्यांना कोरोना अँटीजेंट किंवा RTPCR टेस्ट ची गरज लागणार नाही असे सांगण्यात आले. व महापालिकेच्या अधिकार्याकडुन विनाकारण कार्यवाही होणार नाही असे ग्वाही देण्यात आली.*
तरी सर्व व्यापारी बंधूंनी शासनाने दिलेल्या (अँटीजेंट किंवा RTPCR टेस्ट किंवा लसीकरणाची सर्टिफिकेट जवळ बाळगावे मास्कचा व सॅनिटायझर चा वेळोवेळी वापर करावा, विनाकारण गर्दी करू नये) सर्व नियमांचे पालन करावे.
*आणि व्यापाऱ्यांनी शासनाने दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आपला व्यापार करावा व ११ वाजता व्यापार बंद करावे व आलेल्या गाड्यांचे लोडींग व अनलोडिंग साठी वेळेमध्ये शिथिलता देण्यात आले आहे याप्रमाणे सदर मिटिंग मध्ये सर्व बाबीवर सकारात्मक चर्चा होऊन सगळ्या प्रश्नावर मार्ग काढण्यात आले. त्यामुळे संघाने घेतलेल्या बंद चा निर्णय मागे घेतला आहे त्यानुसार उद्यापासून आपले व्यवहार पुर्ववत चालू राहतील.*
सदर सभेस कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती श्रीशैल नरोळे, सचिव अंबादास बिराजदार साहेब, व त्यांचे सहकारी अधिकारी, संचालक बसवराज इटकळे, केदारनाथ उंबरजे, शिवानंद पुजारी, जेलरोड चे पोलीस निरीक्षक शिंगाडे साहेब, महापालिकेचे संग्राम पाटील साहेब व त्यांचे सगळे अधिकारी वर्ग , भुसार आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री प्रभाकर विभूते, उपाध्यक्ष सुरेश चिक्कळी, सेक्रेटरी मोहन कोंकाटी, श्री अशोक संकलेचा, ऑईल मिल संघाचे अध्यक्ष महालिंगप्पा परमशेट्टी, बारदाना व्यापारी संघाचे अध्यक्ष मल्लिनाथ कटप, मिरची व्यापारी संघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा नरोणे, श्रमजीवी कामगार संघाचे अध्यक्ष सिद्धाराम हिप्परगी आदी सह व्यापारी उपस्थित होते.
या कामी सगळ्यांचे सहकार्य लाभले.
तरी सर्व व्यापारी बंधुंनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती.
आपले
प्रभाकर विभुते - अध्यक्ष
सुरेश चिक्कळी - उपाध्यक्ष
मोहन कोंकाटी - सेक्रेटरी
*भुसार आडत व्यापारी संघ*
बसवराज इटकळे - संचालक
*कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर*
No comments:
Post a Comment