सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित कऱ्हाडला; केंद्रीय पथक करणार पाहणी
सातारा जिल्ह्यात सद्यःस्थितीत सर्वाधिक 31 कोरोनाबाधित रुग्ण कऱ्हाड तालुक्यात आहेत. त्यामध्ये म्हारुगडेवाडी, चरेगाव, बाबरमाची आगाशिवनगर (मलकापूर) व वनवासमाची, कापील, रेठरे बुद्रुक व सांगली जिल्ह्यातील कासेगाव आणि कामेरी येथील रुग्णांचा समावेश आहे.
शहरापासून काही अंतरावरील ही गावे आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी खबरदारी म्हणून 23 एप्रिलपासून कऱ्हाड, मलकापूरसह परिसरातील 12 गावे 100 टक्के लॉकडाउन केली आहेत. शहरात रुग्ण सापडले नसले, तरी येथून जवळच असलेल्या मलकापूर- आगाशिवनगर, वनवासमाची येथील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात आज आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे एकूण बाधित 31 झाले आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक चार किंवा पाच मे रोजी कऱ्हाडला भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी करणार आहे.
No comments:
Post a Comment