“शेवटच्या घटका मोजत असतानाही डॉक्टर, नर्सेस यांना हसवलं”
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीवर दुसरा आघात झाला. अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासही पूर्ण होत नाहीत, तेव्हा ऋषी कपूर यांच्या निधनाची दु:खद बातमी आली. गेल्या दोन वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. मात्र हा लढा अपयशी ठरला. गुरुवारी सकाळी ८.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लहानांपासून थोरांपर्यंत त्यांचा चाहतावर्ग आहे. शेवटच्या घटका मोजत असतानाही त्यांनी डॉक्टर व नर्सेसना हसवलं, असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
कॅन्सरचं निदान झाल्यानंतर ते न्यूयॉर्कला उपचासाराठी गेले होते. त्यांच्यासोबत पत्नी नीतू कपूर पूर्ण वेळ होत्या. अनेक सेलिब्रिटींनी न्यूयॉर्कमध्ये त्यांची भेट घेतली. वेदनेतही ते इतरांना हसवत असत, असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. कुटुंबीय, मित्रपरिवार, चित्रपट आणि विविध खाद्यपदार्थ हेच त्यांचं संपूर्ण जीवन होतं. जगभरातील चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल ते कृतज्ञ होते.
No comments:
Post a Comment