करोनाकाळात सामान्यांची हेळसांड होऊ नये म्हणून केंद्रासह राज्य सरकारने देखील विविध योजनांतर्गत धान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, एकीकडे प्रशासन करोनाशी झुंजत असताना, काही स्वस्त धान्य वितरकांकडून मात्र सामन्यांची फसवणूक केली जात आहे.
केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत स्वस्त धान्याचे वाटप करताना झोपडपट्टी परिसरातील लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा उचलत वितरकांकडून फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. ऑनलाइन प्रक्रियेनंतर लिहून देण्यात आलेल्या शिधापत्रिकेवरील १२ अंकी क्रमांकांत फेरफार करण्यात येत आहेत. एकीकडे फसवणूक होऊनही नागरिक भीतीपोटी तक्रार करण्यास घाबरत असल्याचे दिसत असून तक्रारींसाठी पुढे या, असे आवाहन रेशनिंग अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
करोनाकाळात सामान्यांची हेळसांड होऊ नये म्हणून केंद्रासह राज्य सरकारने देखील विविध योजनांतर्गत धान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, एकीकडे प्रशासन करोनाशी झुंजत असताना, काही स्वस्त धान्य वितरकांकडून मात्र सामन्यांची फसवणूक केली जात आहे. साधारण पाच वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत आधारकार्ड लिंक, कागदपत्रे तपासणी करून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यावेळी वितरकांकडून शिधापत्रिकेवर १२ अंकी 'आरसी' क्रमांक लिहून देण्यात आला होता. या क्रमांकाच्या आधारे सदर कुटुंब किती किलो धान्यासाठी पात्र आहे हे ऑनलाइन पद्धतीने जाणून घेणे सोपे ठरणार होते. मात्र काही ठिकाणी हे क्रमांक लिहूनच न दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर अनेक ठिकाणी, विशेषतः झोपडपट्टी परिसरात लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा उचलत वितरकांकडून आरसी क्रमांकांत फेरफार करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांना त्यांना ठरवून दिलेल्या धान्यापेक्षा कमी धान्य दिले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
तक्रार करण्यास पुढे या'
मुंबई व उपनगरातील अनेक भागात हे प्रकार उघडकीस येत असून सामान्य नागरिक मात्र याबाबतीत तक्रार करण्यास घाबरत आहेत. रेशनिंग दुकानांबाबत तक्रार केल्यास भविष्यात आम्हाला आणखी त्रासाला सामोरे जावे लागेल, अशी भीती ते व्यक्त करतात. ही बाब रेशनिंग अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले असता 'कोणाचीही भीती न बाळगता तक्रार करण्यास पुढे यावे. तक्रारदाराचे नाव उघड न करता संबंधित वितरकांवर कारवाई करू,' असे आवाहन रेशनिंग अधिकाऱ्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment