Lockdown : “यापुढे भारत-पाकिस्तानचा खेळ बंद करा आणि अर्थव्यवस्था सुधारने कडे लक्ष्य द्या उद्धव ठाकरे
करोनाच्या शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. लॉकडाउनचा पहिला टप्पा संपल्यानंतर त्याला मुदतवाढ देण्यात आली. लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात परिणाम झाला असला, तरी मोठं आर्थिक संकट घोंगावू लागलं आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासंदर्भात शिवसेनेनं मोदी सरकारला काही सूचना करतानाच ताशेरेही ओढले आहेत.
देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटाबरोबरच आर्थिक प्रश्नही डोकं वर काढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली. या चर्चेचा हवाला देत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला टोले लगावले आहे. “लॉक डाऊनमुळे महसुलात तूट वाढत जाईल व राज्य चालवणे कठीण होईल. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, प्रशासकीय खर्च, शेतकरी कर्जमाफी, अस्मानी-सुलतानी संकटाचा विचार केला तर योजना राबवायच्या कशा? केंद्राचेही तसेच होणार आहे. भाषणे, आश्वासने यांना मर्यादा पडतात व लोकांच्या पोटातली आग त्यावर हल्ला करते. लोकांनी संयम पाळायचा हे ठीक, पण सरकारला गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या देखील बदलत्या आर्थिक स्थितीचा विचार करावा लागेल. मुख्य म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावे लागेल व दुसऱ्यांचे देखील ऐकावे लागेल. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे अमेरिकेत कमालीचे बदनाम होताना दिसत आहेत. ते फक्त बोलत राहिले, चुकीची विधाने करत राहिले आणि करोना पसरत गेला. ६० हजार लोकांनी प्राण गमावले, चार कोटी लोक गरीब झाले व तरीही चीनला धडा शिकविण्याची भाषा मात्र सुरू आहे. हिंदुस्थानात यापुढे हिंदुस्थान-पाकिस्तानचा खेळ, धर्म व जातवादाची प्यादी हलवणे बंद करून देशाला आर्थिक खाईतून कसे बाहेर काढता येईल यावर सर्वच राजकीय पक्षांनी काम केले पाहिजे. पंतप्रधानांनी त्याकामी पुढाकार घ्यावा. देश पाठीशी उभा राहील. राहुल गांधी-रघुराम चर्चेने आर्थिक संकटाचा विषाणू किती गंभीर आहे ते समोर आले. ही शहाणे होण्याची वेळ आहे,” असा सल्ला शिवसेनेनं मोदी सरकारला दिला आहे.
No comments:
Post a Comment