Friday, May 1, 2020

देशात १३० जिल्हे लाल, तर ३१९ हिरव्या श्रेणीत

देशात १३० जिल्हे लाल, तर ३१९ हिरव्या श्रेणीत


केंद्र सरकारने शुक्रवारी दोन आठवडय़ांसाठी टाळेबंदी वाढवितानाच आरोग्य मंत्रालयाने देशभरातील करोनाबाधित लाल, नारंगी आणि हिरव्या श्रेणी (झोन) जाहीर केल्या आहेत. देशभरातून १३० जिल्हे हे लाल श्रेणीत आहेत, तर २८४ जिल्हे हे नारंगी श्रेणीत आणि ३१९ जिल्हे हे हिरव्या श्रेणीत आहेत.
करोनाबाधित रुग्णांची संख्या, रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण, चाचण्यांचे प्रमाण याचा विचार करून या श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. हे क्षेत्र हे आठवडाभरासाठी वा त्याहून कमी कालावधीसाठी तयार केले असून त्यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कळविण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नव्या वर्गीकरणानुसार मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, पुणे, बंगळूरू आणि अहमदाबाद यासारख्या महानगरांचा समावेश लाल श्रेणीत करण्यात आला आहे. राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना मंत्रिमंडळ सचिवांनी ही माहिती दिली.
श्रेणींची विभागणी
लाल श्रेणी : वाढते रुग्ण. अधिक संख्येने नमुना चाचण्या होत असलेले जिल्हे.
नारंगी श्रेणी : लाल आणि हिरव्या श्रेणी नसलेले जिल्हे.
हिरवी श्रेणी : सलग २१ दिवस नवे रुग्ण आढळले नाहीत असे जिल्हे.
नियंत्रित विभाग : लाल व नारंगी श्रेणीतील अतिसंवेदनशील विभाग
नारंगी श्रेणीतील मुभा
* टॅक्सी आणि अ‍ॅपवरील टॅक्सीसेवा. चालक आणि दोन प्रवासी.
* आंतरजिल्हा प्रवास. पण, स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने.
* चारचाकी गाडय़ांमध्ये जास्तीत जास्त चालकासह दोन व्यक्तींना मुभा.
लाल श्रेणीत बंदी
* लाल श्रेणीमध्ये सायकल रिक्षा, ऑटोरिक्षा, टॅक्सी, टॅक्सी अपसेवा, आंतर जिल्हा आणि जिल्ह्य़ांतर्गत बससेवा, केशकर्तनालय, स्पा, सलून या सेवांवर बंदी.
लाल श्रेणीत मुभा
* स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने चालकासह कमाल दोघांना वाहनातून जाण्यास परवानगी. दुचाकीवर दोन व्यक्तींना परवानगी.
* औषधनिर्मिती, कच्चा माल प्रक्रिया, आयटी हार्डवेअर, बांधकामे.
* जीवनावश्यक आणि बिगरजीवनावश्यक वस्तूंची स्वतंत्र दुकाने.
* ई-कॉमर्सद्वारे जीवनावश्यक सेवांनाच परवानगी.
* वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे व्यवहार.
* सरकारी आणि खासगी कार्यालये खुली राहतील. ३३ टक्के कर्मचारी.
* शेती आणि कुक्कुटपालन
* बँक, विमा आदी वित्तीय संस्था.
* व्यापारी व खासगी कार्यालये, संस्था.
* अंगणवाडी, ज्येष्ठ नागरिक, परित्यक्ता, महिलांसंबंधी संस्था.
अन्य बाबी..
* बिगर जीवनावश्यक सेवा फक्त सकाळी ७ ते संध्या ७ सुरू राहील. गरज भासल्यास जमावबंदी लागू.
* सर्व श्रेणींमध्ये ६५ वर्षांहून अधिक वयोगटातील मधुमेह वगैरे गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुलांनी घरातच राहणे गरजेचे.
* तीनही श्रेणीत बाह्य़रुग्ण विभाग सुरू राहतील. पण, नियंत्रित विभागात मात्र मुभा नाही.

No comments:

Post a Comment

Here's your unique Code snippet. Click this code to copy it right to your clipboard.