Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts

Friday, May 1, 2020

लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना मूळगावी जाण्यासाठी नियोजन सुरू : परिवहन मंत्री

लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना मूळगावी जाण्यासाठी नियोजन सुरू : परिवहन मंत्री

मुंबई : परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात सुखरूप पाठवले जाईल व त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, आणि राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांना सुद्धा मूळ गावी पाठविण्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे अशी महिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे

नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे आणि बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये ग्रुप लीडरच्या माध्यमातून नोंदणी करावी. नोंदणी करत असताना नाव, सध्या रहात असलेला पत्ता, कुठे जाणार आहे त्या ठिकाणाचा पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर यांची नोंद करावी. आणि त्यांना बसनी प्रवास करायचा आहे का रेल्वेनी यांचीही नोंद त्यात करावी. जाणाऱ्या लोकांची संख्या जर एक हजार असेल तर रेल्वेने प्रवासाची व्यवस्था आणि 25 संख्या असेल तर बसने प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी करून त्यांना डॉक्टरांचे तपासणी प्रमाणापत्र सोबत देण्यात येईल.
राज्यांतर्गत अडकलेले लोकांनाही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र जर एखाद्या शहरात किंवा भागात कंटामेंन्ट झोन, हॉटस्पॉट जाहीर केला असेल तर त्यांना त्या ठिकाणाहून जाण्यासाठी परवानगी नाही.

प्रत्येक जिल्हा, तालुका पातळीवर यासाठी नोडल ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशी समन्वय साधून शासनामार्फत व्यवस्था केली जाईल. त्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, गर्दी करू नये असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे.


महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश, 16 जिल्हे ऑरेंज तर 6 ग्रीन झोनमध्ये


महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश, 16 जिल्हे ऑरेंज तर 6 ग्रीन झोनमध्ये

कोरोना  बाबतची संपूर्ण देशातील स्थिती पाहता सर्वात जास्त जिल्हे रेड झोन मध्ये उत्तर प्रदेशातील असून तब्बल 19 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून केंंद्रसरकारने  राज्यातील 14 जिल्हे रेड झोन मध्ये दाखवले आहेत तर 16 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये दाखवण्यात आले आहेत तर उर्वरित 6 जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा  एक आलेखच केंद्राने प्रत्येक राज्याला पाठवला आहे. दुसऱ्या टप्प्यातील लोक डाऊन 3 मे ला संपत असून तत्पूर्वी केंंद्रसरकारने कोणत्या जिल्ह्यांना लाॅकडाऊन मधून शिथीलता देता येईल हे प्रत्येक राज्याला कळविले आहे.


कोरोना  बाबतची संपूर्ण देशातील स्थिती पाहता सर्वात जास्त जिल्हे रेड झोन मध्ये उत्तर प्रदेशातील असून तब्बल 19 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसरा नंबर महाराष्ट्राचा लागत असून, तिसरा नंबर तामिळनाडूचा आहे. ३ मे रोजी लॉकडाऊन लागू करून ४० दिवस पूर्ण होणार आहेत. परंतु कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढतच चालले आहे. लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून लॉकडाऊन शिथिल केल्यास कोरोनाच्या संसर्गाची भीती अशा दुहेरी संकटात देश सापडला आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी केंद्र शासनाने देशभरातील जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये वर्गीकरण करून त्याची यादी आज (१मे) सकाळी प्रसिद्ध केली आहे. ३ मे पासून कोरोना बाधितांची संख्या, डबलिंग रेट आणि चाचण्यांचे प्रमाण याच्या आधारे हे वर्गीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या नियमात देण्यात येणारी शिथिलता झोन निहाय्य निश्चित करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह सचिव प्रीती सुडान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन देशभरातील जिल्ह्यांचे वर्गीकरण रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये करण्यात आले आहे. प्रत्येक राज्याने त्यानुसार रेड आणि ऑरेंज झोनच्या क्षेत्रात कंटेनमेंट झोन आणि बफर झोनच्या हद्दी निश्चित करून केंद्र शासनाला सूचित करावे. कोणत्याही जिल्ह्याला तोपर्यंत ग्रीन झोन मानण्यात येणार नाही जोपर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सलग २१ दिवस नव्याने कोरोनाने बाधित झाल्याचे एकही केस नसेल. शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये देशभरातील १३० जिल्हे रेड झोन मध्ये, २८४ जिल्हे ऑरेंज झोन मध्ये तर ३१९ जिल्हे ग्रीन झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्र व अन्य क्षेत्रांना वेगवेगळे वर्गीकरण करता येऊ शकेल. रेड किंवा ऑरेंज झोन मध्ये असलेल्या जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्र व तालुका क्षेत्र अशी विभागणी करून ज्या ठिकाणी मागील २१ दिवसात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसेल अशा ठिकाणी झोनचा दर्जा कमी करता येईल.

आज जाहीर केलेल्या यादी मध्ये महराष्ट्रातील १४ जिल्हे रेड झोन मध्ये, १६ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर ६ जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोन मध्ये करण्यात आला आहे. रेड, ऑरेंज व ग्रीन झोन क्षेत्रात लॉकडाऊन संदर्भातील नियमावली येत्या ३ मे रोजी घोषित केले जाईल.

झोन निहाय्य जिल्ह्यांचे वर्गीकरण

रेड झोन : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, पालघर, यवतमाळ, धुळे, अकोला आणि जळगाव

ऑरेंज झोन : रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा आणि बीड

ग्रीन झोन : उस्मानाबाद, वाशीम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचीरोली आणि वर्धा.


Thursday, April 30, 2020

जालना-बदनापूरच्या तहसिलदार छाया पवार निलंबित: मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याचा ठपका

जालना-बदनापूरच्या तहसिलदार छाया पवार निलंबित: मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याचा ठपका

जालना : जालना-बदनापूरच्या तहसिलदार छाया पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. कोविड-19 काळात कामातील अनियमितता यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.अत्यावश्यक कामे नियमितपणे पार पाडणे आवश्यक होते.औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणुचे अनेक रुग्ण आढळुन आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये औरंगाबाद येथून ये-जा केल्यास जालना जिल्ह्यामध्ये कोव्हीड-19 विषाणुचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने जालना-बदनापूरच्या तहसिलदार छाया पवार यांनी मुख्यालयी उपस्थित राहून अत्यावश्यक कामे नियमितपणे पार पाडणे आवश्यक होते. निलंबित करत अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर मात्र त्या मुख्यालयी उपस्थित राहत नव्हत्या. कोव्हीड-19 बाबतचे विविध अहवाल वरिष्ठ कार्यालयास विहित कालावधीमध्ये सादर न करणे, शासकीय कामात दुर्लक्ष करणे, दुष्काळी अनुदान मागणीत अनियमितता, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात दुर्लक्ष, अवैध गौणखनिज वाहतुक प्रकरणात अनियमितता, गौण खनिजाचे अनाधिकृत वाळुसाठे व वाहतुकीवर नियंत्रण न ठेवणे, शासकीय वसुलीमध्ये दुर्लक्ष करणे या कारणावरुन बदनापुरच्या पवार यांना निलंबित करण्यात आले. गुरुवारी जालनाच्या जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार पवार यांना निलंबित करत अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे.बदनापुरचा पदभार दिलीप शेनफड सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आलानिलंबनाच्या काळामध्ये पवार यांना उप विभागीय अधिकारी कार्यालय, जालना हे मुख्यालय देण्यात आलेले असुन तहसिलदार, बदनापुरचा पदभार पुढील आदेशापर्यंत नायब तहसिलदार (निवडणूक) दिलीप शेनफड सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे

राज्यात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी - राजेश टोपे

राज्यात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी - राजेश टोपे



मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आता प्लाझ्या थेरपीचा आधार घेण्यात येत आहेत. जे कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झालेत आहेत. त्यांच्या प्लाझ्मा घेऊन कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूग्रस्तावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात ही चाचणी करण्यात आली असून, आता दुसऱ्या रुग्णावर पुन्हा प्लाझ्मा थेरपीने उपचार केले जात असल्याचं टोपे यांनी सांगितले. 

राज्यात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून याला मान्यता देण्यात आली आहे. या उपचार पद्धतीत कोरोना विषाणूमुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाझ्मा हा घटक घेऊन, तो कोरोना विषाणू बाधिताच्या रक्तात सोडला जातो, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र ही पद्धत कोरोना विषाणू ग्रस्तावर उपचारासाठी वापरावी, याचा अद्यापतरी काहीही ठोस पुरावा नसल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

राज्यात १७७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले


राज्यात काल कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ४५ हजार ७९८ नमुन्यांपैकी १ लाख ३४ हजार २४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १० हजार ४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६८ हजार २६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ६९५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गुरुवारी राज्यात २७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या आता ४५९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २०, तर पुणे शहरातील ३ आणि ठाणे शहरातील २ रुग्ण आहेत. या शिवाय नागपूर शहरात १ आणि रायगडमध्ये १ मृत्यू झाला आहे
Here's your unique Code snippet. Click this code to copy it right to your clipboard.