Sunday, May 30, 2021

 

धमाकेदार फीचर्ससह सर्वात स्वस्त मायक्रो SUV Tata HBX भारतात लाँच होणार

    

Tata Motors कंपनी मोस्ट अवेटेड HBX मायक्रो SUV लॉन्च करण्याची तयारी करत आहे, या कारची भारतात यापूर्वी कित्येक वेळा चाचणी घेण्यात आली आहे.


Tata HBX

मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी मोस्ट अवेटेड HBX मायक्रो SUV लॉन्च करण्याची तयारी करत आहे, या कारची भारतात यापूर्वी कित्येक वेळा चाचणी घेण्यात आली आहे. Tata HBX नुकतीच प्रोडक्शन अवतारामध्ये पाहायला मिळाली आहे, जी अ‍ॅलोय व्हील्स आणि प्रोडक्शन-स्पेक लाइटिंग सिस्टमसह सुसज्ज आहे. (cheapest micro SUV Tata HBX to be launched soon in India, check price and features)

या एसयूव्हीचं फ्रंट डिझाईन टाटा हॅरियरपासून प्रेरित आहे, ज्यात टॉपला स्लीक एलईडी डीआरएल (डेटाइम रनिंग लाइट्स) आणि बंपर्सवरील मुख्य हेडलॅम्प युनिट असलेला स्प्लिट हेडलॅम्प सेटअप आहे. स्लीक एलईडी डीआरएल वरच्या ग्रिलमध्ये मर्ज्ड आहेत.

Tata HBX चं डिझाईन

अप्पर फ्रंट ग्रिल आणि डीआरएलसाठी एक क्रोम अंडरलायनिंग आहे, तर खालच्या ग्रिलमध्ये एक इन्व्हर्टेड ट्राय-एरो डिझाइन मिळेल. बम्परमध्ये फॉग लँप आणि डिटेल्ड एयर-इनटेक फीचर देण्यात आलं आहे. मायक्रो एसयूव्हीमध्ये ब्लॅक प्लास्टिकची क्लॅडिंग देण्यात आली आहे. बंपर बॉडी कलरने पेंट केलेलं नाही. प्रोडक्शनसाठी तयार असलेल्या टाटा एचबीएक्समध्ये ब्लॅक आउट पिलर आणि फ्लोटिंग रूफलाइन आहे. रूफ बॉडीच्या रंगात रंगवलेलं नाही. तथापि, मायक्रो एसयूव्हीमध्ये कॉन्ट्रास्टिंग शेड्स देखील असतील.

Tata HBX मध्ये काय असेल खास?

ही एसयूव्ही आधी पांढऱ्या रंगात पाहायला मिळाली होती. मायक्रो एसयूव्हीमध्ये मशीन-कट अ‍ॅलोय व्हील्स, एलईडी टेल-लाइट्स, सी-पिलर्सवर रियर डोर हँडल्स, ब्रेक लाइट्ससह रूफ-इंटिग्रेटेड स्पॉयलर, ब्लिंकर्ससह ओआरव्हीएम आणि इतर फिचर्स मिळतील.

Tata HBX चं प्रोडक्शन व्हर्जन तिच्या कॉन्सेप्टवर अखंड राहील. कारची लांबी 3,840 मिमी, रुंदी 1,822 मिमी, उंची 1,635 मिमी आणि व्हीलबेस 2,450 मिमी आहे. केबिन मूळ डिझाइन आणि फीचर्स टिकवून ठेवेल. यात फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, 3-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, ब्लॅक फॅब्रिक सीट्स, हर्मन ऑडिओ सिस्टम, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल, एम्बियंट लाइटिंग, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, एबीएस विथ एबीडी, कॉर्नरिंग स्टेबिलिटी कंट्रोल, पार्किंग सेन्सर समाविष्ट आहेत.

दमदार इंजिन

या एंट्री-लेव्हल एसयूव्हीला 1.2 लीटर 3 सिलेंडर नॅचुरली-एस्पिरेटेड इंजिन मिळेल जे Tiago आणि Altroz ला पॉवर देतं. हे इंजिन 86 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतं. हे 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह येऊ शकतं जे 100 bhp च्या जवळपास पॉवरसह येतं. ट्रांसमिशन पर्यायांमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

Busar adat solapur

 *श्री भुसार आडत व्यापारी संघ सोलापूर* 

                 दिनांक २४/५/२०२१

       आपल्या बाजारपेठेतील सर्व व्यापारी बंधूंना कळविण्यात येते की, शनिवार दिनांक २२/५/२०२१ रोजीच्या *कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय विजयकुमार देशमुख मालक आणि मनपाचे उपायुक्त माननीय धनंजय पांडे साहेब आणि संघाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली होती सदर  बैठकीतील आश्वासनानुसार आज सोमवार दिनांक २४/५/२०२१ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठक पार पडली.

    सदर बैठकीमध्ये *मनपाचे उपायुक्त श्री धनराज पांडे साहेब यांनी व जेलरोड चे पोलीस निरीक्षक शिंगाडे साहेब यांनी समन्वय साधून व्यापाऱ्यांचे जे-जे अडचणी आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा होवुन ते दूर करण्यात येईल आणि गेट मध्ये अधिकारी वर्गाकडून अरेरावी  व विनाकारण कार्यवाही होणार नाही याप्रमाणे आश्वासन दिले. तसेच ज्या व्यापार्यांनी लस घेतले आहे त्यांना कोरोना अँटीजेंट किंवा RTPCR टेस्ट ची गरज लागणार नाही असे सांगण्यात आले. व महापालिकेच्या अधिकार्याकडुन विनाकारण कार्यवाही होणार नाही असे ग्वाही देण्यात आली.*

   तरी सर्व व्यापारी बंधूंनी शासनाने दिलेल्या (अँटीजेंट किंवा RTPCR टेस्ट किंवा लसीकरणाची सर्टिफिकेट जवळ बाळगावे मास्कचा व सॅनिटायझर चा वेळोवेळी वापर करावा,  विनाकारण गर्दी करू नये)  सर्व नियमांचे पालन करावे. 

    *आणि व्यापाऱ्यांनी शासनाने दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आपला व्यापार करावा व ११ वाजता व्यापार बंद करावे व आलेल्या गाड्यांचे लोडींग व अनलोडिंग साठी वेळेमध्ये शिथिलता देण्यात आले आहे याप्रमाणे सदर मिटिंग मध्ये सर्व बाबीवर सकारात्मक चर्चा होऊन सगळ्या प्रश्नावर मार्ग काढण्यात आले. त्यामुळे संघाने घेतलेल्या बंद चा निर्णय मागे घेतला आहे त्यानुसार उद्यापासून आपले व्यवहार पुर्ववत चालू राहतील.*

     सदर सभेस कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती श्रीशैल नरोळे, सचिव अंबादास बिराजदार साहेब, व त्यांचे सहकारी अधिकारी, संचालक बसवराज इटकळे, केदारनाथ उंबरजे, शिवानंद पुजारी, जेलरोड चे पोलीस निरीक्षक शिंगाडे साहेब, महापालिकेचे संग्राम पाटील साहेब व त्यांचे सगळे अधिकारी वर्ग , भुसार आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री प्रभाकर विभूते, उपाध्यक्ष सुरेश चिक्कळी, सेक्रेटरी मोहन कोंकाटी, श्री अशोक संकलेचा, ऑईल मिल संघाचे अध्यक्ष महालिंगप्पा परमशेट्टी, बारदाना व्यापारी संघाचे अध्यक्ष मल्लिनाथ कटप, मिरची व्यापारी संघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा नरोणे, श्रमजीवी कामगार संघाचे अध्यक्ष सिद्धाराम हिप्परगी आदी सह व्यापारी उपस्थित होते. 

     या कामी सगळ्यांचे सहकार्य लाभले. 

      तरी सर्व व्यापारी बंधुंनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती.

           आपले

प्रभाकर विभुते - अध्यक्ष 

सुरेश चिक्कळी - उपाध्यक्ष 

मोहन कोंकाटी - सेक्रेटरी 

*भुसार आडत व्यापारी संघ*

बसवराज इटकळे - संचालक

*कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर*

Sunday, May 3, 2020

सोलापुरातील नगरसेवकाच्या मुलासह चौदा जणांना 'कोरोना

सोलापूर : यापूर्वी पॉझीटीव्ह आढळलेल्या नगरसेवकाच्या मुलासह त्यांच्या घरातील तिघांना  'कोरोना'ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी नव्याने चौदा कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या १२८ इतकी झाली आहे.

शहर व जिल्ह्यातून आत्तापर्यंत २0८0 रुग्ण उपचारास दाखल करण्यात आले, त्यातील १८८३ जणांचे अहवाल आले असून १७५९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आहेत. अद्याप १९७ जणांचे अहवाल यायचे आहेत अशी माहिती प्रशासनाने रविवारी दिली.  दिवसभरात चौदा जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामध्ये चार महिला व सहा पुरूष आहेत. अशाप्रकारे आता पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या १२८ झाली आहे. पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये फॉरेस्ट चांदणी चौकात राहणाºया नगरसेवकाचा मुलगा व इतर दोन कुटंबातील सदस्यांचा समावेश आहे. हे नगरसेवकाला कुमठा नाका येथील रुग्णाच्या संपर्कात आल्याने यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यावर कुटुंबातील मंडळींची २ मे रोजी तपासणी करण्यात आली. त्यात तिघांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.
त्याचबरोबर शास्त्रीनगरातील एका ५0 वर्षीय महिलेला कोरणाची लागण झाली आहे. नई जिंदगीतील साईनाथनगरात राहणाºया ५३ वर्षीय महिलेला सारीची लागण झाली आहे. तसेच बापूजीनगरातील ८0 वर्षाचे आजोबा व २0 वर्षाचा तरुण कोरोना पॉझीटीव्ह आढळले आहेत. भारतरत्न इंदिरानगरातील मुलगी व तिच्या पित्यालाही कोरोणाची बाधा झाल्याचे रविवारच्या अहवालात दिसून आले आहे. पॉझीटीव्ह आलेल्या १२८ रुग्णांपैकी ६ जण मरण पावलेले आहेत, तर १९ जण बरे होऊन घरी परतले आहेत.

दोन रुग्ण पुन्हा पॉझीटीव्ह
यापूर्वी पॉझीटीव्ह म्हणून रुग्णालयात उपचारास दाखल झालेल्या दोघांचा १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांना घरी सोडण्यासाठी एका ३0 वर्षीय महिला व ३0 वर्षाच्या तरुणाची दुबार चाचणी घेण्यात आली. यामध्येही त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.

पोलिसांनी घेतली खबरदारी
ग्रामीण पोलीस मुख्यालयातील दोन पोलिसांना कोरोणाची लागण झाल्याचे दिसून येताच बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाºयांनी आता चांगलीच खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. नाकाबंदीला असलेले कर्मचारी दुरूनच वाहनांची तपासणी व त्यात असलेल्या व्यक्तींपासून दूर राहून नोंदी घेण्याचे काम सुरू केल्याचे दिसून आले. 

तिसऱ्या टप्यात मद्यविक्रीला सशर्त परवाना देण्यात आला आहे.

गृह मंत्रालयाने शुक्रवारी टाळेबंदीची मुदत १७ मेपर्यंत दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची घोषणा करतानाच, हरित व नारिंगी क्षेत्रांमधील अनेक निर्बंध उठवले होते. ४ मेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात हरित व नारिंगी क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच तिन्ही क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.
हरित, नारिंगी व लाल या तिन्ही क्षेत्रांमध्ये, बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र ) मद्यविक्रीस बंदी ठेवण्यात आली आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली होती. लॉकडाउन च्या दोन्ही टप्प्यात मद्यविक्रीवर बंदी होती. मात्र, ४ मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्यात मद्यविक्रीला सशर्त परवाना देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं योग्य पालन केलं तर मद्यविक्रीची दुकानं सुरु केली जाऊ शकतात असे संकेत दिले होते.
लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर देशात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व राज्यांनी लॉकडाउनची कडक अमलबजावणी केल्यानं या काळात मद्यपींची दारुसाठी चांगली दैना झाली. केरळमध्ये तर मद्यपी आत्महत्या करत असल्याच्याही घटना समोर आल्या. त्यानंतर केरळ सरकारनं व्यसन जडलेल्या मद्यपींना डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असेल तर दारु देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, देशभरात दारू विक्री बंदच होती. विशेष म्हणजे या काळात अवैध मार्गानं होणारी दारू विकणाऱ्यांवरही धाडी टाकण्यात आल्या.

Saturday, May 2, 2020

नाशिकमध्ये चिंता वाढली! जिल्ह्यात आढळले २४ नवे रुग्ण

नाशिकमध्ये चिंता वाढली! जिल्ह्यात 

आढळले २४ नवे रुग्ण

नाशिक जिल्ह्यात आज ६६ रुग्णांचेअहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी २४ जण कोविड १९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात मालेगावातील १२ जणांचा समावेश आहे. शहरातील अनेक भागांत प्रथमच रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली आहे.

आले आहेत. यामध्ये सात नवीन रुग्ण असून उपचार घेणाऱ्या पाच बाधित रुग्णांचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे या रुग्णांना आणखी काही दिवस उपचार घ्यावे लागणार आहेत.


शहरासह जिल्ह्यात १२ जण बाधित

नाशिक शहरातील अनेक भागात नव्याने बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. यामध्ये पाथर्डी फाटा, उत्तम नगर, पंचवटीतील हिरावाडी, देवळाली, सातपूर कॉलोनी येथील रुग्णांचा समावेश आहे. हा सर्व दाट लोकवस्तीचा परिसर असून त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

चांदवड, येवल्यात आणखी एक पॉझिटिव्ह

चांदवड तालुक्यातील देवरगाव येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. याशिवाय नांदगाव तालुक्यातकही करोना विषाणूने शिरकाव केला असून मनमाडला एक रुग्ण आढळला आहे. सिन्नर तालुक्यातही पुन्हा एक रुग्ण बाधित आढळला आहे. याशिवाय सिव्हिल हॉस्पिटल येथे एका ५४ वर्षीय व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली आहे.

गाडी थांबवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाच नेलं फरफटत

गाडी थांबवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाच नेलं फरफटत

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे


पंजाबातील जालंधर शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका तपासणी चौकीवर पोलिसांनी गाडीतून जाणाऱ्या व्यक्तीची चौकशी तपासणी करण्यासाठी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता या व्यक्तीने थेट पोलिसांच्या अंगावरच गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. तपासणी चौकी आल्यानंतर गाडीचा वेग कमी करण्याऐवजी तो वाढवत चालक एक पोलीस अधिकाऱ्याला काही फुटांपर्यंत आपल्या गाडीच्या बोनेटवर घेऊन गेला. इतर पोलिसांनी पाठलाग करुन ही गाडी थांबवली आणि पोलीस अधिकाऱ्याची सुटका केली. यासंदर्भातील व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे.
‘जालंधर शहरामध्ये एक कार चालक पोलीस अधिकाऱ्याला आपल्या गाडीच्या बोनेवट काही अंतर घेऊन गेला. हा पोलीस अधिकारी या व्यक्तीला लॉकडाउनच्या काळात सुरु असणाऱ्या तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न करत होता,’ असं एएनआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी गाडीच्या बोनेटवर असतानाही गाडी वेगाने धावता दिसत आहे. पोलीस अधिकारी गाडी बोनेटला पकडून असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पोलीस अधिकारी गाडीचा पाठलाग करुन तिला थांबवतात आणि नंतर चालकाला ताब्यात घेतात असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

एप्रिल महिन्यामध्ये पतियाळा येथे लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले असता पोलिसाचा हात कापल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पंजाब पोलिसांच्या एका अधिकाऱ्याला अशा प्रकारच्या घटनेच्या प्रसंगाला समोरे जावे लागले. पतियाळामध्ये तपासणी चौकीवर कर्फ्यू पास मागितल्याने तसंच भाजी मंडईत जाण्यापासून रोखल्याने निहंगा समुदायातील काही जणांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हरजीत सिंह यांचा हात तलवारीने कापण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीने कापलेला हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आल्याचेही वृत्त नंतर समोर आलं होतं.

Friday, May 1, 2020

देशात १३० जिल्हे लाल, तर ३१९ हिरव्या श्रेणीत

देशात १३० जिल्हे लाल, तर ३१९ हिरव्या श्रेणीत


केंद्र सरकारने शुक्रवारी दोन आठवडय़ांसाठी टाळेबंदी वाढवितानाच आरोग्य मंत्रालयाने देशभरातील करोनाबाधित लाल, नारंगी आणि हिरव्या श्रेणी (झोन) जाहीर केल्या आहेत. देशभरातून १३० जिल्हे हे लाल श्रेणीत आहेत, तर २८४ जिल्हे हे नारंगी श्रेणीत आणि ३१९ जिल्हे हे हिरव्या श्रेणीत आहेत.
करोनाबाधित रुग्णांची संख्या, रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण, चाचण्यांचे प्रमाण याचा विचार करून या श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. हे क्षेत्र हे आठवडाभरासाठी वा त्याहून कमी कालावधीसाठी तयार केले असून त्यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कळविण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नव्या वर्गीकरणानुसार मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, पुणे, बंगळूरू आणि अहमदाबाद यासारख्या महानगरांचा समावेश लाल श्रेणीत करण्यात आला आहे. राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना मंत्रिमंडळ सचिवांनी ही माहिती दिली.
श्रेणींची विभागणी
लाल श्रेणी : वाढते रुग्ण. अधिक संख्येने नमुना चाचण्या होत असलेले जिल्हे.
नारंगी श्रेणी : लाल आणि हिरव्या श्रेणी नसलेले जिल्हे.
हिरवी श्रेणी : सलग २१ दिवस नवे रुग्ण आढळले नाहीत असे जिल्हे.
नियंत्रित विभाग : लाल व नारंगी श्रेणीतील अतिसंवेदनशील विभाग
नारंगी श्रेणीतील मुभा
* टॅक्सी आणि अ‍ॅपवरील टॅक्सीसेवा. चालक आणि दोन प्रवासी.
* आंतरजिल्हा प्रवास. पण, स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने.
* चारचाकी गाडय़ांमध्ये जास्तीत जास्त चालकासह दोन व्यक्तींना मुभा.
लाल श्रेणीत बंदी
* लाल श्रेणीमध्ये सायकल रिक्षा, ऑटोरिक्षा, टॅक्सी, टॅक्सी अपसेवा, आंतर जिल्हा आणि जिल्ह्य़ांतर्गत बससेवा, केशकर्तनालय, स्पा, सलून या सेवांवर बंदी.
लाल श्रेणीत मुभा
* स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने चालकासह कमाल दोघांना वाहनातून जाण्यास परवानगी. दुचाकीवर दोन व्यक्तींना परवानगी.
* औषधनिर्मिती, कच्चा माल प्रक्रिया, आयटी हार्डवेअर, बांधकामे.
* जीवनावश्यक आणि बिगरजीवनावश्यक वस्तूंची स्वतंत्र दुकाने.
* ई-कॉमर्सद्वारे जीवनावश्यक सेवांनाच परवानगी.
* वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे व्यवहार.
* सरकारी आणि खासगी कार्यालये खुली राहतील. ३३ टक्के कर्मचारी.
* शेती आणि कुक्कुटपालन
* बँक, विमा आदी वित्तीय संस्था.
* व्यापारी व खासगी कार्यालये, संस्था.
* अंगणवाडी, ज्येष्ठ नागरिक, परित्यक्ता, महिलांसंबंधी संस्था.
अन्य बाबी..
* बिगर जीवनावश्यक सेवा फक्त सकाळी ७ ते संध्या ७ सुरू राहील. गरज भासल्यास जमावबंदी लागू.
* सर्व श्रेणींमध्ये ६५ वर्षांहून अधिक वयोगटातील मधुमेह वगैरे गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुलांनी घरातच राहणे गरजेचे.
* तीनही श्रेणीत बाह्य़रुग्ण विभाग सुरू राहतील. पण, नियंत्रित विभागात मात्र मुभा नाही.
Here's your unique Code snippet. Click this code to copy it right to your clipboard.